Maharashtra
Nandurbar Mr: Tree plantation Campaign with Dainik Bhaskar

प्रजापिता ब्रह्मकुमारी नंदुरबार तर्फे वृक्षारोपण अभियान नंदुरबार – शहरातील कोरिट रस्त्यावरील जयचंद नगर भागातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य केंद्रात आज रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी माउंट आबू राजस्थानच्या दिवंगत दादी प्रकाश मनीजी यांच्या बाराव्या स्मृती प्रित्यर्थ ओम शांती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिमा पूजन आणि वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नंदुरबार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आणि निझर बाजार समितीचे संचालक परवेज खान आणि डॉ. भगवान भाई पटेल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तर नंदुरबार केंद्राच्या मुख्य संचालिका विजया दीदी यांच्या हस्ते दिवंगत दादी प्रकाशमनी जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या समारंभास नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर ,पत्रकार रणजित राजपूत, तसेच मीडिया विंगचे जिल्हा समन्वयक महादू हिरणवाळे ,उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नंदुरबार केंद्रातील बंधू आणि भगिनी यांनी केले. पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करुन प्रजापिता ब्रह्माकुमारी परिवारातर्फे नंदुरबार शहरात शंभरावर वृक्षारोपण करुन संगोपन करण्याचा मानस संयोजकांनी व्यक्त केला. फोटो ओळी नंदुरबार येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य केंद्राबाहेर वृक्षारोपण प्रसंगी उपस्थित उपनगराध्यक्ष परवेज खान सोबत केंद्र संचालिका विजया दीदी डॉक्टर भगवान पटेल योगेश अमृतकर महादू हिरणवाळे तसेच सेवाधारी बंधू-भगिनी